नुकत्याच जाहीर झालेल्या २०२६ सालच्या ६८ व्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारांमध्ये टॉमी कोह, रुना खान आणि बो की हे चे विजेते ठरले आहेत.
ठळक मुद्दे:
- 'रॅमन मॅगसेसे अवॉर्ड फाउंडेशनमार्फत (Ramon Magsaysay Award Foundation - RMAF)' फिलिपिन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या ११९ व्या जयंतीनिमित्त नुकतीच २०२६ सालच्या ६८ व्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.
- टॉमी कोह (सिंगापूर), रुना खान (बांगलादेश) आणि बो की (म्यानमार) यांना हे २०२६ सालचे हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
- १५ नोव्हेंबर २०२६ रोजी फिलिपिन्सची राजधानी मनिला येथे आयोजित समारंभात हे पुरस्कार अधिकृतपणे प्रदान केले जातील.
२०२६ चे विजेते आणि त्यांचे योगदान:
टॉमी कोह (सिंगापूर)
- ज्येष्ठ मुत्सद्दी आणि कायदेतज्ज्ञ म्हणून ते सुप्रसिद्ध आहेत.
- १९८२ मध्ये 'समुद्र कायद्यावरील संयुक्त राष्ट्रांचा करार (United Nations Convention on the Law of the Sea - UNCLOS) स्वीकारला जाण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
- विविध देशांमधील संवाद वाढवणे तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणे या त्यांच्या उत्कृष्ट योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
रुना खान (बांगलादेश)
- त्या बांगलादेशी स्वयंसेवी संस्था (Non-Government Organization - NGO) 'फ्रेंडशिप (Friendship)' च्या संस्थापक आहेत.
- बांगलादेशातील 'चार' (नदीपात्रातील गाळाची बेटे) समुदायांच्या कल्याणासाठी ही संस्था प्रामुख्याने कार्य करते.
बो की (म्यानमार)
- 'की' हे माजी राजकीय कैदी आहेत.
- राजकीय कैद्यांच्या हक्कांसाठी लढा देणे तसेच म्यानमारमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाची नोंद ठेवणे या कार्यासाठी विशेषतः ओळखले जातात.
रॅमन मॅगसेसे पुरस्काराबद्दल (Ramon Magsaysay Awards) महत्वपूर्ण माहिती:
- पुरस्काराची सुरुवात: फिलिपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या सन्मानार्थ १९५७ मध्ये फिलिपिन्स सरकार आणि 'रॉकफेलर ब्रदर्स फंड' चे विश्वस्त यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती.
- वैशिष्ट्य: सदर पुरस्कार हा 'आशियाचा नोबेल पुरस्कार (Asia’s Nobel Prize)' म्हणून देखील ओळखला जातो.
- प्रथम पुरस्कार वितरण सोहळा: ३१ ऑगस्ट १९५८ रोजी पहिल्यांदा या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले होते.
- पुरस्कार स्वरूप: प्रत्येक विजेत्याला राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांची प्रतिमा असलेले पदक, अधिकृत प्रशस्तिपत्र आणि ५०,००० अमेरिकन डॉलर्सचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात येते.
प्रमुख भारतीय विजेते (पुरस्कार विजेते वर्ष) आणि विभाग:
- आचार्य विनोबा भावे (१९५८): सामुदायिक नेतृत्व
- चिंतामणराव देशमुख (१९५९): शासकीय सेवा
- मदर तेरेसा (१९६२): शांतता व आंतरराष्ट्रीय समजूतदारपणा
- बाबा आमटे (१९८५): समाजसेवा
- किरण बेदी (१९९४): उत्कृष्ट शासकीय सेवा
- डॉ. प्रकाश व मंदाकिनी आमटे (२००८): समाजसेवा
- रवीश कुमार (२०१९): पत्रकारिता
- डॉ. रवी कन्नन आर. (२०२३): कर्करोग उपचार व आरोग्य सेवा